Ajit Pawar । मुंबई : अजित पवार गट शिंदे-भाजपसोबत सत्तेत गेल्यापासून सतत शरद पवार गटावर (Sharad Pawar group) टीका करत आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे भाषण करताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याशिवाय बारामतीकरांना भावनिक साद घातली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवार गटाच्या नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. (Latest marathi news)
Supriya Sule । सुप्रिया सुळेंना धक्का बसणार? अजित पवार बारामतीतुन तगडा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत
“अजित पवार यांच्यावर भाषणाची वेळ आली की ते मंचावरून पळून जायचे. संसदेत भाषणाची वेळी आली की नेमके बाथरूममध्ये असायचे. कारण त्यांना हिंदी आणि इंग्रजीदेखील बोलता येत नाही. महाराष्ट्राला त्यांच्या या मर्यादा माहिती नव्हत्या. त्या मर्यादा आता आम्हाला लोकांना सांगाव्या लागतील. त्यांना हिंदीत भाषण करता येत नसल्याने त्यांचा पीए त्यांना भाषण लिहून द्यायचा,” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खोचक टीका केली आहे. (Jitendra Awhad vs Ajit Pawar)
Manoj Jarange । मनोज जरांगेंच नारायण राणेंसंदर्भात मोठे वक्तव्य; म्हणाले, “तू माझ्यापेक्षा वयाने…”
“ज्यावेळी शरद पवार यांची प्रसिद्धी हिमालयावर असायची, त्यावेळी तुम्ही खालून पिन मारुन पंचायत करुन टाकायचे. राजीनामा द्यायचे. काहीतरी वेगळं विचित्र करायचे. एमएससी बँकमध्ये तुम्ही केलेले लोच्चे, आलं शरद पवार यांच्यावरती. मग तुम्ही राजीनामा दिला. मग कशाला उगीच नाटकं केली?”, असा संतप्त सवालही जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना विचारला आहे.