Ajit Pawar । अजित पवार सध्या रायगड (Raigad) दौऱ्यावर आहेत. यावेळी रायगडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे. या भूमिपूजनानंतर अजित पवार यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले, कोणीही गाफील राहू नका. कोणी काही वक्तव्य करत असेल तर तसं करू नका. जर कोणी वक्तव्य केले तर त्याची नोंद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे घेतात. त्यावर आमची व्यवस्थित चर्चा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना दुखवून घेऊ नका. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
त्याचबरोबर आगामी निवडणुकीमध्ये ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे आपलं स्लोगन असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, “सध्या आपण युतीमध्ये आहोत. काम करताना विरोधात प्रश्न विचारून प्रश्न सुटत नाही. त्यामुळे सत्तेत असणं खूप गरजेचं असतं. लोकसभेत मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडून आणून पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडून आणायचे आहे. असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
त्याचबरोबर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना देखील मोठा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्ही काम करा. कुठे दगडफेक केली, कुठे शिवीगाळ केला असं आपण करू नका. गेल्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी इथे आपली सीट आणायचे आहे. असा विचार करून काम करा. असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
Manisha Kadane । धक्कादायक बातमी! लेखी परीक्षा पास फक्त ग्राऊंड राहिलेलं, पण घडलं वेगळंच…