
Eknath Shinde । सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पुन्हा पेटला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आंतरवाली सराटीमध्ये ते उपोषणाला बसले आहेत. सोमवारी (19 फेब्रुवारी) जरांगे यांच्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे.
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनीही सरकारला 20 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला असून या तारखेपर्यंत आपल्या समर्थकांना शांत राहण्यास सांगितले आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात मोठं भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यामध्ये टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीतलं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळेल. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Ajit Pawar । “पुन्हा एकदा मोदींना…”अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य