
Raigad News । आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील वेगेवेगळ्या ठिकाणी अनेक मोठं मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन हे शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आले आहे. अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने किल्ल्यांवर देखील जात आहेत. यामध्येच आता रायगडावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Heart Attack । धक्कादायक घटना! चालत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका, 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
हिरकणी कड्यावर फिरायला गेलेले दोन तरुण अडकल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी रोप वेच्या मार्गावरून जाताना स्थानिकांनी या तरूणांना पाहिले. आणि त्यांनतर हे तरुण अडकल्याचे समजताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सध्या या तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीम देखील दाखल झाली आहे.
Eknath Shinde । शिवनेरी किल्ल्यावरून मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी केली सर्वात मोठी घोषणा!
हे दोन तरुण ट्रेकींग करण्यासाठी आले होते मात्र कड्याच्या मध्यभागी आल्यावर त्यांना खाली उतरणे किंवा पुन्हा गडावर जाणे कठीण झाले. त्यामुळे ते दोघेही तिथेच थांबले. मदतीसाठी रुमालाने इशारा करत होते. यांनतर नागिरकांना याची माहिती मिळाली. सध्या दोघांची सुटका करण्यासाठी रेस्कू टिमकडून शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.
Nitesh Rane । पोलिसांविषयी नितेश राणे यांचे धक्कादायक विधान; म्हणाले, “ते फक्त बायकोला…”