मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (shilpa shetty) पती राज कुंद्राला गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी (Mumbai police) राजला पॉर्नोग्राफिक प्रकरणात अटक केली होती. राजला (Raj kundra) आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येऊन वर्ष पूर्ण झालं. यानिमित्तानेच त्याने ही पोस्ट (social media post) लिहिली.
Pune: उद्यापासून पुण्यातील ‘ही’ बँक होणार कायमची बंद, कारण…
राज कुंद्राची पोस्ट
या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, आर्थर रोड तुरुंगातून (Arthur Road Jail) बाहेर येऊन आज वर्ष पूर्ण झालं. ही फक्त योग्य वेळेची बाब आहे .मला न्याय मिळेलच .पॉर्नोग्राफिक प्रकरणी लवकरच सत्य बाहेर येईल. माझ्या हितचिंतकांचं आभार आणि ट्रोलर्सचा मी त्याहून अधिक आभारी आहे. तुम्ही मला अजून ताकदवान बनवता. तसेच याप्रकरणी ज्यांना संपूर्ण गोष्ट माहीत नाही, त्यांनी तोंड बंद ठेवावं, असाही सल्ला त्याने या पोस्टमधून दिला.
One Year Today released from #ArthurRoad Its a matter of time Justice will be served! The truth will be out soon! Thank you well wishers and a bigger thank you to the trollers you make me stronger 🙏 #enquiry #word #mediatrial #trollers pic.twitter.com/KVSpJoNAKo
— Raj Kundra (@TheRajKundra) September 21, 2022
Aditya Thackeray: तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
नेमक काय आहे प्रकरण
उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला जुलै 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून सशुल्क अॅप्सवर प्रसारित केल्याचा गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारीमध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवून नऊ जणांना अटक केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 रोजी त्याची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
Sugar factory: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू