Sangli Accident । क्षणात होत्याच नव्हतं झालं..! कारच्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

accident news

Sangli Accident । सांगली जिल्ह्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या शिरढोण या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण पुलाजवळ हा अपघात झाला आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळे यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाल्या, “शरद पवारांना राजकारणातून…”

या अपघातामुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली आहे. अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त वाहन सांगोल्याहून कोल्हापूरकडे जात होते. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेटर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डिव्हायडरला जाऊन आदळली आणि हा भीषण अपघात झाला.

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार गटाला सर्वात मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश

या अपघाताची माहिती मिळताच तेथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. एक जण या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Indapur News । अक्षय साळुंखे यांची राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष इंदापूर तालुक्यासाठी निवड

Spread the love