
Manoj Jarange । संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. (Maratha reservation protest) राज्य मागासवर्गाच्या अहवालात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण याला देखील मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोध केला आहे. (Latest marathi news)
Maratha Reservation । मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध, टायर जाळत रास्ता रोको आंदोलन
मनोज जरांगेंनी विधेयक मंजूर होऊनही सगेसोयऱ्याच्या बाबतीत निर्णय न झाल्याचं कारण देत उपचार घेणं थांबवलं आहे. तसेच त्यांनी पुन्हा तीव्र उपोषण सुरु केले. उद्या ते आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. (Maratha reservation strike) उद्या मराठा समाजाने मोठ्या संख्येने बैठकीसाठी अंतरवाली सराटीमध्ये यावं, असं आवाहन मनोज जरांगेनी केले आहे.
“आज मंजूर झालेला कायदा गोरगरीब मराठा समाजामुळे मंजूर झाला आहे. असं असलं तरी आम्ही या आरक्षणाची मागणी केलेलीच नाही. तरीही दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर मराठ्यांच्या उद्रेकाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे,” असा इशारा देखील मनोज जरांगेनी दिला आहे. मनोज जरांगेच्या उद्याच्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rituraj Singh । मनोरंजन विश्वाला मोठा धक्का! ऋतुराज सिंह यांचं निधन