Manoj Jarange । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील आता थेट दिल्लीत आंदोलन करणार? सरकारचं टेन्शन वाढणार!

Manoj Jarange

Manoj Jarange । आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. राज्य मागासवर्गाच्या अहवालात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण याला देखील मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोध केला आहे. अशातच आज ते आपल्या आंदोलनाची (Maratha Reservation Strike) पुढची दिशा ठरवणार आहे. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । सरकारने फसवणूक केली…आरक्षण मिळाल्यांनतर मनोज जरांगे कडाडले; पुन्हा उपोषण करणार?

सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आज (अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाची बैठक बोलावली असून या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. बैठकीआधीच जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Accident News । कामावरून घरी चालले होते मात्र काळाने घातला घाला; रिक्षा आणि ट्रकच्या अपघातात ९ जणांचा मृत्यू

“जर राज्य सरकार खरंच शहाणं असेल, तर त्यांनी ओळखावं की मराठा पूर्वीसारखा राहीला नाही. पूर्वीपेक्षा तो आता शहाणा झाला आहे. सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलजावणी करून आतातरी कायदा पारित करावा, नाहीतर आंदोलनाची दिशा ठरलीच म्हणून समजा. आता पुढचं आंदोलन कदाचित महाराष्ट्रापेक्षा बाहेर होणार आहे. आता नुसता महाराष्ट्र हादरवून काही फायदा नाही. आता मराठा आंदोलन लाल किल्ल्यावर जाणार, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.

Sharad Pawar । मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Spread the love