Tania Singh । सोमवारी, 19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगच्या आत्महत्येची माहिती समोर आली आहे. सुरतच्या वेसू रोडवरील हॅपी एलिगन्स अपार्टमेंटमध्ये तानियाने आत्महत्या केली. आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. वास्तविक, तानिया सिंग आत्महत्या प्रकरणात सुरत पोलिसांनी सनरायझर्स हैदराबादचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि पंजाबचा देशांतर्गत क्रिकेटपटू अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) समन्स पाठवले आहे.
Disqualification Matter । शरद पवार यांना सर्वात मोठा झटका? अजित पवार यांनी खेळली मोठी खेळी
सुरत पोलिसांनी अभिषेक शर्माला समन्स पाठवले
सुरत पोलिसांनी अभिषेक शर्माला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना तानियाचा आयपीएल खेळाडू अभिषेक शर्माशी संपर्क असल्याचे समोर आले. मात्र, काही काळ अभिषेक आणि तानिया यांच्यात संपर्क होत नव्हता. पोलिसांनी अभिषेकला त्याच्या आणि तानियाच्या मैत्रीबाबत चौकशीसाठी बोलावले आहे.
Parbhani News । धक्कादायक बातमी! महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे 3 वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कॉल डिटेल्सनुसार तानिया आणि अभिषेक शर्मा यांच्यात अलीकडे कोणताही संपर्क झालेला नाही. मात्र, त्यांच्या मैत्रीमुळे अभिषेकला चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.” तानिया सिंगच्या आत्महत्येची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण सुरत शहरात खळबळ उडाली आहे. या मॉडेलने वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी आत्महत्या करून आपले जीवन संपवले.