Jayant Patil । “मनोज जरांगे शरद पवार यांचा माणूस” या आरोपावर जयंत पाटील यांचं उत्तर, म्हणाले…

Jayant Patil

Jayant Patil । शरद पवार सांगतात तसेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) करतात. शरद पवार (Sharad Pawar) यांचाच फोन जरांगे पाटील यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला. पुण्यामध्ये जरांगे पाटील यांचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीच लावले होते. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत. असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे. आता या सर्व आरोपांवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

Rohit Pawar । रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर सर्वात मोठा आरोप; म्हणाले, “त्यांनी एकट…”

जयंत पाटील म्हणाले की, “शरद पवार साहेबांचा संपर्क कधीच मनोज जरांगे यांच्याशी झालेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे असा माझा अंदाज आहे. असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतोय? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घ्यावी असे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत.

Rajendra Patni Passed Away । राजकीय वर्तुळातून दुर्देवी बातमी! भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे सहकारी अजय बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनतर आता एका महिलेने गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे हा शरद पवार यांचा माणूस आहे. शरद पवार जसं सांगतात तसं जरांगे करतात, असा गंभीर आरोप संगीत वानखेडेंनी केला आहे.

HSC Board Exam । बारावीच्या परीक्षेला बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ पोलीस बनून परीक्षाकेंद्रावर आला, अधिकाऱ्यांना माहिती मिळताच…

Spread the love