Manoj Jarange Patil । महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचे ठरवले आहे. 24 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा मराठा नेत्यांनी केली. अंतरवली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी असा दावा केला की, सरकारने मराठ्यांना कोटा दिला आहे, मात्र तो समाजाच्या गरजेनुसार पुरेसा नाही, त्यामुळे तो स्वीकारला जाणार नाही.
Ajit Pawar । भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले, ‘मस्ती आली आहे का?’
बेमुदत उपोषणाच्या 12 व्या दिवशीजरांगे पाटील यांनी कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्यामुळे मराठ्यांना फक्त ओबीसी आरक्षण मिळावे, असे सांगत त्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “आम्ही जे मागितले ते सरकारने दिले नाही. निवडणुकीपूर्वी राजकीय कारणांसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात आले. मराठ्यांच्या हिताचे रक्षण करायचे आहे. त्यांनी आम्हाला मोटारसायकल दिली पण पेट्रोल नाही, त्यामुळे आम्हाला हे मान्य नाही. असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम
आपल्या मागण्या शासन दरबारी पूर्ण व्हाव्यात यासाठी जरांगे पाटील यांनी २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामुळे बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. या आंदोलनात सर्व गावे, आणि शहरांमध्ये मिरवणुका आणि निदर्शनांचाही समावेश असेल. ज्येष्ठ मराठ्यांनी आपापल्या गावातील उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Devendra Fadnavis । एबीपी लाइव्हशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!