Ajit Pawar । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar group) आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यानंतर हे दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. शरद पवार गटातील अनेकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. दरम्यान आता पुन्हा एकदा एका शरद पवार गटातील बड्या नेत्याने अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यामधील सर्कीट हाऊस या ठिकाणी बैठका सुरु आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाचे बडे नेते राजेश टोपे अजित पवार यांची भेट घेल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीवेळी राजेश टोपे आणि अजित पवार यांच्यामध्ये कोणीही नव्हते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांना माध्यमांनी गाठले. त्यावेळी त्यांनी चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला. यामुळे या भेटीत काय खलबंत झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Fire News । झोपडीला लागली आग, मुलींचा मोठा आक्रोश; अन् काही क्षणातच आगीत ४ बहिणी जिवंत जळाल्या