Supriya Sule । पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत… माझ्या मतदारसंघातील (बारामती) उजनी धरण आणि नाझरे धरणात पाणी संपले आहे. पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची गंभीर चिंता आहे. त्यामुळे मी आलेय” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, या बैठकीत सरकारने विचार करावा, अशी विनंती करणार आहोत. अजित पवारांना माझ्या मतदारसंघातील पाणी प्रश्नांची माहिती देण्यासाठी मी त्यांना भेटायला आले. असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
राजेश टोपेंनीही घेतली अजित पवारांची भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यामधील सर्कीट हाऊस या ठिकाणी बैठका सुरु आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाचे बडे नेते राजेश टोपे अजित पवार यांची भेट घेल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीवेळी राजेश टोपे आणि अजित पवार यांच्यामध्ये कोणीही नव्हते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांना माध्यमांनी गाठले. त्यावेळी त्यांनी चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला. यामुळे या भेटीत काय खलबंत झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Fire News । झोपडीला लागली आग, मुलींचा मोठा आक्रोश; अन् काही क्षणातच आगीत ४ बहिणी जिवंत जळाल्या