
मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या (shivsena) दसरा मेळाव्याबाबत शिवसेना आणि शिंदे गट (Shinde group) यामध्ये वाद सुरू आहे. हा वाद थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान आता दुसरीकडे मुंबई पालिकेन या दसरा मेळाव्याबाबत (Dasara melava) महत्वाची भूमिका घेत एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेनं (BMC) एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर(Shivaji park) दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे.
Oily Skin: तेलकट चेहऱ्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय; होईल फायदा, वाचा सविस्तर
महापालिकेनं कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. ही परवानगी पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे नाकारल्याचे पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रातून दिसून येत आहे. दरम्यान आता शिवसेनेनं उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
का अपयशी ठरत आहेत भारतीय गोलंदाज धावसंख्येचा बचाव करण्यात? समोर आली कारणे..
“न्यायालयाचा जो निर्णय येईल, तो आम्ही स्वीकारू”- किशोरी पेडणेकर
दसरा मेळाव्यासाठी महापालिकेने दिलेल्या निर्णयावरून किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, “बीकेसीमध्ये दसरा मेळावा करण्यासाठी शिंदे गटाला परवानगी मिळाली आहे. पण तरीही शिवाजी पार्कमध्ये घुसून ते परवानगी मागत आहेत. या दबावाला पोलीस किंवा पालिका प्रशासन बळी पडणार नाहीत. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा त्यांच्यावर ढकलला जाईल, या दृष्टीने त्यांनी परवानगी नाकारली आहे. पण आता न्यायालयाचा जो निर्णय येईल, तो आम्ही स्वीकारू.”