Manoj Jarange । मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!

Devendr Fadanvis

Manoj Jarange । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सलाईन मधून मला विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीस यांचा डाव होता. असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Yavatmal News । पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला

त्याचबरोबर पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस तुम्ही माझा बळी घ्या.. मात्र खोटे आरोप सहन करणार नाही. तुम्हाला कायमचा आयुष्यातून उठवेल अशा शब्दात जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या.. मी आत्ता सागर बंगल्यावर येतो.. मला त्या ठिकाणी गोळ्या घाला.. मात्र खोटे आरोप सहन करणार नाही. असं जरांगे पाटील म्हणाले आहे.

Maratha Reservation । धक्कादायक बातमी! जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरूच आहे. रविवारी म्हणजेच आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजासमोर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Maratha Reservation । धक्कादायक बातमी! जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

Spread the love