Devendra Fadnavis । मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सलाईन मधून मला विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीस यांचा डाव होता. असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते सगेसोयऱ्याचे आरक्षण देऊ देत नाही. त्यांनी पक्षातील लोकांना संपवले आहे. ते कोणाला मोठे होऊ देत नाहीत. असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी बोलताना शिविगाळ देखील केली आहे. आता मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले आहेत. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange । मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!
माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपाबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘मनोज जरांगे काय बोलले मी ऐकलेच नाही. यामुळे मी कशा कशाला उत्तर देऊ.’ असं फडणवीस म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील आंधळी धरणावर आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.