Ashok Chavan । दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Strike) मुद्दा पेटत चालला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता भाजपाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “हा प्रश्न समन्वयातून सोडवला पाहिजे. सरकारने प्रयत्न केला, कायदाचा आधार घेउन सभागृहात कायदा पारित केला. मात्र आज निर्माण झालेलं चित्र हे काळजी करण्यासारखं आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये समन्वयातून मार्ग निघावा, अशी ईच्छा असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना गंभीर इशारा; म्हणाले, ‘काहीही केलं तरी…’
गुणरत्न सदावर्ते यांनीही दिली प्रतिक्रिया
वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना राज्याला अशांत करण्याचं काम केले जात आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून अमुकाच्या घरी जातो तमुकाच्या घरी जाऊन बघा काय होतं, मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित केलं आहे.”
Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य