
मुंबई : काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचर आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ही शेवटची निवडणुक असणार असल्याची टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. आता या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Lumpy: लम्पी रोगाचा राज्यात धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यात मनुष्यबळ कमी, तरी लसीकरणात अव्वल
2019 मध्ये माझा शेवट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तिघांनी मिळून एकत्रितपणे मला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. त्याचबरोबर फडणवीस पुढे म्हणाले “ते मला संपवू शकले नाहीत आणि संपवू शकणारही नाहीत”. त्याचबरोबर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडून आला नव्हता, तर मोदींचा (Modi) फोटा लावून निवडून आलात अशी जहरी टीका देखील फडणवीसांनी यावेळी केली.
दरम्यान उद्धव ठाकरे काल भाषणावेळी म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कारभार कसा चालू आहे? हे कुणालाच माहीत नाही. पण सर्वजण एकत्र येऊन शिवसेनेला (Shivsena) बदनाम करायचं काम करत आहेत. पण सगळे जरी आले तरी आसमान काय असतं ते आम्ही त्यांना दाखवू. पण तुमच्या लक्षात आणून देतो की तुमची ताकद किती आहे, हे तुम्हाला कळालं नाही. पण आपल्या विरोधकांना कळलं आहे. असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये केला आहे.