मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन केलं. त्यामुळे महाविकास आघाडीच सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच उलथापालथ झालेली आपल्याला पाहायला मिळाली यामध्येच आता ठाकरे सरकार नेमकं कोणत्या कारणाने पडलं याबाबत भाजप नेते आणि माजी आमदार राम शिंदे यांनी एक विधान केलं आहे.
15 ऑक्टोबरपासून सुरू होणार ऊस गाळप हंगाम,यंदा 3,050 रुपये एफआरपी
पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले, :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मीडियासमोर आले असते तर, महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं”, राम शिंदेंच्या या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शेतकरी झाले चिंतामुक्त, सरकारने केला शेतजमीन खरेदी-विक्रीमध्ये मोठा बदल
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी बैठका घेतल्या नाहीत. ते कधी मंत्रालयात गेले नाहीत. पण आता सरकार पडल्यावर र ते खडबडून जागे झाले असून, बैठका घ्यायला लागलेत. तसेच सरकार पडल्यामुळे उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत राम शिंदेनी उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावलाय.