Raj Thackeray: राज ठाकरेंचा एक निवेदनातून सूचक इशारा, म्हणाले -“…तर महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील”

Raj Thackeray's warning in a statement, said - "...then Maharashtra soldiers will teach a lesson in their own way"

मुंबई : आज शुक्रवारी (23 सप्टेंबर) मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक निवेदन जारी करत राज्यात सुरू असलेल्या लहान मुलांच्या (kids) वेठबिगारीवर चिंता व्यक्त केली. एवढच नाही तर राज ठाकरे यांनी राज्य सरकारने तात्काळ या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. राज ठाकरेंनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज ठाकरेंनी गरज पडलीच तर वेठबिगारी (the disorder) करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र (Maharashtra) सैनिक आपल्या पद्धतीने धडाही शिकवतील, असा सूचक इशारा दिला.

Pakistan: पाकिस्तान कर्णधार बाबर आझमचा रिझवानसोबत विश्वविक्रम, विराट कोहलीला टाकले मागे

“…..हे महाराष्ट्र राज्याला शोभणारं नाही”

ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडल्याच्या बातम्या या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं, तरी ही प्रथा अस्तित्वात आहे. महत्वाचं म्हणजे या घटना प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आढळणं हे महाराष्ट्र राज्याला शोभणारं नाही,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

लिंबू बहाराबाबत आवश्यक माहिती, वाचा एका क्लिकवर

वेठबिगारी ही एक क्रूर प्रथा

पुढे ठाकरे म्हणाले की, “राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. कारण वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे आणि या प्रथेच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता असायला हवी.”

MPSC: आता एमपीएससीतून होणार लिपिक पदाची भरती, मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला महत्वपूर्ण निर्णय!

जर तुम्हाला असे प्रकार कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. असं आवाहन देखील या ट्विटद्वारे राज ठाकरेंनी केलं.

BJP: “…तर ठाकरे सरकार कधीच कोसळलं नसतं”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *