Asim Sarode । राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार (Shinde group MLA) दोन वर्षांपूर्वी गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी या आमदारांनी दारुच्या नशेत गुंग होऊन गुवाहाटीमधील एअर हॉस्टेसचा विनयभंग (Air hostess molestation) करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
वकील असीम सरोदे यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिवमधील ‘निर्भय बनो’ या सभेत सरोदे यांनी हे आरोप केले आहेत. “गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. त्यांना आठ किलोमीटरवरून पकडून आणलं. त्यांना गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण केली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण केली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?”, असा सवाल असीम सरोदे यांनी उपस्थित केला.
पुढे सरोदे म्हणाले की, “शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जिथे थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी काही रुम्स बुक केलेल्या होत्या. त्याच रूमच्या वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्राने शोधावं, असा सल्लाही असीम सरोदे यांनी दिला आहे.