Ajit Pawar । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. त्यापूर्वी अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम त्यांना आगामी निवडणुकीत पाहायला मिळू शकतो. (Latest marathi news)
काही दिवसांपूर्वी मावळमधील राष्ट्रवादी (अजित पवार गटात) राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह तब्बल 137 जणांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पण या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. येत्या गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) मावळमध्ये संवाद मेळावा घेणार आहेत.
त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. अशातच मावळ तालुक्यातील हे नाराज 137 जण शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षात यांच्या प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.