Mahashivratri । महाशिवरात्रीच्या मिरवणुकीला गालबोट, विजेचा धक्का लागून 14 मुले गंभीर जखमी

Mahashivratri

Mahashivratri । आज महाशिवरात्री आहे. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीचे उत्सव सुरु आहेत. महाशिवरात्री असल्याने मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पण याच महाशिवरात्रीच्या मिरवणुकीला गालबोट लागल्याची माहिती समोर आली आहे. विजेचा धक्का लागून तब्बल 14 मुले गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीचा धक्का, सहकारी साखर कारखाना जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनीसार, राजस्थानच्या कोटामध्ये महाशिवरात्रीच्या निम्मित दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ भगवान शंकराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागला. यात 14 मुले गंभीर भाजली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांनी तातडीने जखमी मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Amrita Fadnavis Song । महाशिवरात्रीच्या निमित्तानं अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा Video

मिरवणुकीत एका मुलाच्या हातात 20 ते 22 फूट लांबीचा लोखंडी पाईप होता, तो वर हाय टेंशन वायरला चिकटला. पाइप लोखंडी असल्याने विद्युत प्रवाह पसरला आणि तिथे उपस्थित असणाऱ्या इतर मुलांना देखील विजेचा धक्का बसला. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला, असे स्थानिकांचे मत असून मुलांच्या कुटुंबीयांनी आयोजकांना मारहाण देखील केली.

Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप

Spread the love