Rohit Pawar । शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामीत अॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून आता शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना (Kannada Cooperative Sugar Factory) जप्त करण्यात आला आहे. या कारखान्याची किंमत 50 कोटी 20 लाख रुपये आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. आता या प्रकरणावर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
Mahashivratri । महाशिवरात्रीच्या मिरवणुकीला गालबोट, विजेचा धक्का लागून 14 मुले गंभीर जखमी
पाहा रोहित पवार यांचे ट्विट
“माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय”.
ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?😂
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 8, 2024
पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!
माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न…