Nagpur News । महाराष्ट्रातील नागपुरात दहावीच्या परीक्षेच्या तणावामुळे एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी (8 मार्च) ही माहिती दिली. माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता दहावीचा विद्यार्थी इंग्रजीचा पेपर देण्यासाठी गेला होता. यानंतर तो सायंकाळी ७ वाजता परतला आणि त्यांने गुजरवाडी येथील बांधकाम सुरू असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Lok Sabha Election । ब्रेकिंग! महायुतीतील जागावाटपाबाबत आतली बातमी आली समोर
पोलिसांनी पुढे सांगितले की, घरात काम करणारे मजूर सामान ठेवण्यासाठी गेले असता दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार ठोठावूनही आतून प्रतिसाद न आल्याने कामगारांनी आत जाऊन पाहिले असता विद्यार्थी लटकलेला दिसला. कामगारांनी लगेच त्याच्या वडिलांना कळवले. यानंतर कामगारांनी दरवाजा तोडून आत जाऊन विद्यार्थ्याला खाली उतरवून रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Samruddhi Mahamarg Accident । भयानक अपघात! समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार
मुलाच्या वडिलांनी सांगितले की, परीक्षेमुळे विद्यार्थी खूप दडपणाखाली होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.
Baramti । सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची गळाभेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण