Supriya Sule । पुणे : राज्याच्या राजकारणात सतत कोणते ना कोणते ट्विस्ट येत आहे. यामुळे जनतादेखील हैराण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून पक्षात दोन गट तयार झाले आहेत. पण पक्षात फूट पडूनही अनेकदा दोन्ही गटाचे नेते पक्षात फूट नसल्याचे सांगतात. अशातच काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी गळाभेट घेतली होती. (Latest maarthi news)
यामुळे पडद्यामागे नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होत होता. ही घटना ताजी असताना आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार आहेत. पुणे शहरात मनपाच्या हॉस्पिटल भूमीपूजनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघेही एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. यावेळी हे तिन्ही नेते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हॉस्पिटल बांधण्यासाठी पुणे मनपा संबंधित एजन्सीला 350 कोटींची कर्ज हमी देणार असून पालिकेच्या जागेत खासगी एजन्सीमार्फत हे हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. भूमीपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त सुप्रिया सुळे आणि अजित पवार एका मंचावर येणार आहेत. दरम्यान, यापूर्वी बारामतीत आयोजित महारोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र आले होते.