खडकीच्या सरपंचपदी सौ.सविता शितोळे यांची बिनविरोध निवड!

Mrs. Savita Shitole's unopposed election as Sarpanch of Khadki!

दौंड : खडकीच्या माजी सरपंच स्नेहल काळभोर यांनी २६ ऑगस्ट रोजी राजीनामा दिला होता. यामुळे खडकीचे सरपंचपद रिक्त झाले होते. त्यानुसार आज दि.२३ रोजी नवीन सरपंच पदासाठी निवडणूक प्रकिया ग्रामपंचायत कार्यालय खडकी येथे पार पडली.

Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते बचतगटाला मिळालेल्या वाहनांचे पूजन

यावेळी सरपंच पदासाठी सौ.सविता दत्तात्रय शितोळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे खडकीच्या सरपंचपदी सविता शितोळे यांची बिनविरोध निवड झाली, याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश भालेराव यांनी केली.

शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी, शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका

यावेळी बोलताना नवनियुक्त सरपंच सौ.सविता शितोळे म्हणाल्या की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांच्या सहकार्याने गावातील विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करु असे सांगितले. निवडणुकीच्या वेळी, निवडणूक निर्णय अधिकारी श्री.गिरीश भालेराव, ग्रामविकास अधिकारी श्री.सुधीर नेपते, माजी सरपंच कु.स्नेहल काळभोर, उपसरपंच श्री.राहुल गुणवरे, मा.जि.प सदस्य श्री.संजय काळभोर, संचालक श्री.महेश शितोळे, माजी पं.स.उपसभापती श्री.प्रकाश नवले, श्री.मच्छिन्द्र काळभोर, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर खडकी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Shrikant Shinde: “मी देखील खासदार आहे त्यामुळे मला, कुठे बसायचं आणि…” श्रीकांत शिंदेनी दिल स्पष्टीकरण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *