
Bjp । अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या अर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मोफत साड्या देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र या साड्या जुन्या आणि फाटक्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray । निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा; भाजपवर केले गंभीर आरोप

विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये काय म्हंटल आहे?
फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला ? गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला? राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे.
Baramati Politics | सर्वात मोठी बातमी! बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!
२०२३-२०२४या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी ३५५रुपये दिले आहे. स्वस्त धान्य दुकानातून या साड्यांचे वाटप होत आहे. या साड्यांच्या निमित्ताने महिलांना या सरकारने रांगेत लावले. इतका सारा त्रास सहन करून हाती आलेल्या साड्या पाहिल्या तर काय त्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी, कळंब, मारेगावसह अनेकानेक तालुक्यांत या घटना समोर आल्या. या महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.’
Mumbai Crime । धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी आहे. म्हणून तर दोन दिवसांपूर्वी नागपुरातील रेशीमबागेत महिला कामगारांना किटन किट वाटपाच्या नाराखाली रांगेत लावले. सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून वाटप बंद केले. सरकारचा फोलपणा लक्षात आल्याने कामगार महिला चिडल्या. संतापल्या..! चेंगराचेंगरी झाली आणि एका मायमाऊलीचा जीव गेला. दुसऱ्या दिवशी वाटप बंद केले. कुठे रेशनवर मायमाऊलींना फाटक्या साड्या दिल्या जातात, कुठे किचन किटच्या नावावर जीव जातात. जाहिरातबाजीसाठी महिला भगिनींची चेष्ठा का ? असे ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 12, 2024
तर मग देता कशाला ?
गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला?
राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात,… pic.twitter.com/5xCKFLyPo5