Urfi Javed: आली लहर केला कहर! मोबाईलमधील सिमकार्डपासून बनवला उर्फी जावेदने ड्रेस

Havoc came wave! Urfi Javed made a dress from a SIM card in a mobile phone

मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. बऱ्याचदा उर्फी तिच्या कपड्यांने लोकांची मने जिंकते, तर कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता उर्फीने एक नवीनच ड्रेस घालून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीने यावेळी सिमकार्डपासून बनवलेला ड्रेस परिधान केला आहे.

Devendra Fadnavis: दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेनेला मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

उर्फी जावेदने आतापर्यंत ब्लेड, सॅक, प्लॅस्टिक, दगड, अगदी इलेक्ट्रिक वायरपासून बनवलेला ड्रेस परिधान केले आहेत . उर्फी अनेकदा असे म्हणताना दिसते की ती स्वतः तिचा ड्रेस डिझाइन करते. यावेळी तर उर्फीने कमालच केली आहे. तिने मोबाईल सिमकार्डने ड्रेस बनवला आहे. उर्फी जावेदने सिमकार्डने बनवलेला छोटा ड्रेस परिधान करून सर्वांना चकित केले आहे. उर्फीने निळ्या आणि पिवळ्या रंगाचे सिम कार्ड वापरून क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट तयार केला आहे, जो परिधान करून खुपच सुंदर दिसत आहे.

Abdul Sattar: “दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेनेला मिळाली” यावर अब्दुल सत्तारांनी केला खुलासा, म्हणाले…

या नवीन लुकचा फोटो शेअर करत उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हाला विश्वास आहे का हे सिम कार्डपासून बनवले आहे?”. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. दरम्यान उर्फीने फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर खळबळ माजवली आली. उर्फीच्या प्रत्येक फोटोची आणि व्हिडीओची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का! वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर आता ‘ही’ दिग्गज कंपनीनीही होणार स्थलांतरीत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *