दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट आयुष्मान भारत योजनेला (Ayushman Bharat Yojana) चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेचे सीईओ राम सेवक शर्मा म्हणाले की, आज चार वर्षांनंतर सुमारे चार कोटी लोकांना या योजनेचा लाभ (Benefits of the scheme) झाला आहे. देशातील जवळपास सर्वच राज्ये (states) या योजनेशी जोडली गेली असली तरी, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि दिल्ली या राज्यांतून अद्याप सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही.
खुशखबर ! ‘या’ पदासाठी परीक्षा न देता मिळणार नोकरी, असा करा अर्ज
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, या राज्यांशी चर्चा सुरू आहे. लवकरच या राज्यांतही लोक सामील होतील, अशी आशा त्यांना आहे. देशातील जनतेचे आरोग्य चांगले असेल तरच यश मिळते आणि समृद्धी येते. समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांना आरोग्याचा लाभ मिळवून देण्याची सरकारची योजना आहे. ही आयुष्मान भारत योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय आहे असही मांडविया म्हणाले.
Urfi Javed: आली लहर केला कहर! मोबाईलमधील सिमकार्डपासून बनवला उर्फी जावेदने ड्रेस
मुलीला नवजीवन मिळाले
तनुश्री चार वर्षांची होती. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या मेंदूमध्ये ट्यूमर आहे. अंदमानमध्ये राहणारी तनुश्रीची आई बी.कुमारी यांनी सांगितले की, तिच्या कुटुंबाची कमाई खूपच कमी आहे. ज्यामध्ये घराचा खर्च नीट चालत नाही. अशा परिस्थितीत आयुष्मान योजनेंतर्गत चेन्नईमध्ये ब्रेन ट्युमरवर उपचार करण्यात आले, ज्यासाठी 96000 रुपये खर्च आला. या योजनेच्या मदतीने मुलीचे उपचार सहज होऊ शकले. आयुष्मान योजना त्यांच्यासाठी वरदान ठरली.
आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये बिहारचेही लोक
या योजनेच्या लाभांमध्ये बिहारच्या राखी कुमारीचाही समावेश आहे. राखीच्या हृदयात छिद्र होते. राखीचे वडील दिलीप यांनी सांगितले की, मुलीवर भागलपूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, या आजाराच्या उपचारासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. राखीवर आयुष्मान योजनेतून उपचार करून घेतले.
डिजिटल पद्धतीने कनेक्ट होणारे लोक
दादर नगर हवेलीतील सुजल कुमार यांनी सांगितले की, त्यांना आयुष्मान कार्ड बनवण्यात कोणतीही अडचण आली नाही. सर्व काही डिजिटल झाले .ऑरा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केवळ सुजलच नाही तर लडाखचा रहिवासी टेशवांग रिंगजिन यानेही त्याचे आयुष्मान कार्ड बनवले आहे.
अशा प्रकारे बनते आयुष्मान कार्ड
आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली जातात. याआधी लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते.ज्यामध्ये नाव दिसल्यास आयुष्मान गोल्ड कार्ड बनवता येते. आयुष्मान भारत योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही सरकारच्या मोफत हेल्पलाइन नंबर 14255 वर कॉल करू शकता.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का! वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर आता ‘ही’ दिग्गज कंपनीनीही होणार स्थलांतरीत