![Evm Machine](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2024/03/Evm-Machine-1024x576.jpg)
Suprme Court | निवडणुकीतील पराभवानंतर काही राजकीय पक्षांकडून ईव्हीएमवर (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स) अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईव्हीएम मशिन्सबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे.
![Ads](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2024/03/image-1.png)
सध्या लोकसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. माहितीनुसार, एक नाही, तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल आक्षेपाच्या वेगवेगळ्या अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे.
ईव्हीएम मशीनच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आरोप करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगासाठी हा मोठा दिलासा आहे. निवडणूक हरलेल्या अनेकांनी या मशीनबाबत खंत व्यक्त केली होती मात्र अशा लोकांसाठी देखील हा मोठा धक्का मानला जात आहे.
Pune Fire News । पुण्यात अग्नितांडव! प्रसिद्ध गॅरेजलला भीषण आग; सगळीकडे आरडाओरडा