WhatsApp New Feature । व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेताय? जरा थांबा, वापरकर्त्याला जाणार अलर्ट

WhatsApp New Feature

WhatsApp New Feature । हल्ली मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा (Social media) वापर केला जातो. काहीजण सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी करतात तर काहीजण याच्या माध्यमातून पैसे कमावतात. अनेकजण व्हॉट्सॲपचा (WhatsApp) वापर करतात. तुम्ही याच्या माध्यमातून पैसेदेखील पाठवू शकता. कंपनी आपल्या वापरकर्त्यांना विविध फीचर्स घेऊन येत असते. (Latest marathi news)

Lok Sabha Elections । बीडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच दादांचा निष्ठावंत शिलेदार सोडणार साथ?

सध्या व्हॉट्सॲपने आपल्या ग्राहकांसाठी असेच एक फीचर्स (WhatsApp Feature) आणले आहे, ज्याच्या माध्यमातून वापरकर्त्याला कोणाच्याही व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट (Screenshot of WhatsApp DP) घेता येणार नाही. मेसेजिंग ॲपमध्ये प्रायव्हसी अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जर कोणी आपल्या व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेत असेल तर तातडीने आपल्याला एक अलर्ट येईल.

Hardik Pandya । हार्दिक पांड्या पुन्हा जखमी? समोर आली मोठी बातमी, पाहा व्हिडिओ

Ads

ही सुविधा मोबाईल फोन आणि डेस्कटॉप दोन्हीवर उपलब्ध असली तरी मेटा किंवा व्हॉट्सॲपने या अपडेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. पण या फिचरमुळे सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मला व्हॉट्सॲप टक्कर देईल. जरी वापरकर्त्यानी डीपीचा स्क्रीनशॉट घेतला तर त्यांच्या फोनमध्ये ब्लॅक स्क्रीनचा स्क्रीनशॉट सेव्ह होईल.

Navneet Rana । ब्रेकिंग! नवनीत राणा राजीनामा देणार? राजकीय घडामोडींना वेग

दरम्यान, हे लक्षात घ्या की व्हॉट्सॲपचे हे अपडेट सर्व्हर साईटवर अपडेट आहे आणि ते टप्प्याटप्प्याने लोकांसाठी आणले जाईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्हॉट्सॲपचे स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे हे फीचर बाय डीफॉल्ट अॅक्टिव्ह केलं असल्याने ते तुम्हाला डिलीट किंवा बंद करता येणार नाही. यूजर्सच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सअपचं हे फीचर उत्तम आहे.

Lok Sabha Election । सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार, 7 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता

Spread the love