Manoj Jarange । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. आरक्षणासाठी जरांगे पाटील हे ठिकठिकाणी सभा देखील घेत आहेत. अशातच काल केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्या. त्यांनतर जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
Ashok Chavan । ब्रेकिंग! मध्यरात्री अशोक चव्हाण मनोज जरांगेच्या भेटीला; नेमकं काय घडलं?
“देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे नवीन व्हिडिओ काढायला सुरुवात केली असून ते व्हिडिओ एडिट करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मी मेलो तरी हरकत नाही. नुकतीच बीडच्या वडवणीमध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पुढे जरांगे म्हणाले की, मी सरकारला आधी सावध करणार नाही. लवकरच आम्ही आमची भूमिका मांडणार आहे. सत्ताधारांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. यांचा जीव सत्तेत असल्याने त्यांना सत्ताच मिळू देणार नाही. आरक्षणासाठी आता मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार आहे,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.