Maharashtra Politics । एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. इतकेच नाही तर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर देखील दावा केला. न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने देखील शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष आणि चिन्ह तयार करावे लागले.
पक्षात बंड होऊन अनेक दिवस झाले तरीही विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते हिंगोली माध्यमांसोबत संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, “हिंदुह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सगळी सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली होती. पण ठाकरे यांनी शिवसेनेचा सत्यानाश केला. ठाकरेंकडे शिवसेना सोपवून बाळासाहेब ठाकरे यांनी महापाप केले आहे, ” असं खळबळजनक विधान संतोष बांगर यांनी केले आहे
काल उद्धव ठाकरे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी कळमनुरी येथे सभा घेत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली. “मी संतोष बांगर यांना विधानसभा तिकीट देऊन महापाप केलं होतं आता त्यांना निवडणुकीत तुम्ही धडा शिकवा, असेआवाहन ठाकरे यांनी मतदारसंघातील लोकांना केले आहे. ठाकरे यांच्या या टीकेला आता बांगर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ