
Breaking । सध्या एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. 2006 च्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्याआधी प्रदीप शर्मा यांची मुंबईच्या कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.
लखन भैय्याच्या वकिलाने वरच्या न्यायालयात सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे दोषमुक्तीचा निर्णय रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांना तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय या प्रकरणातील अन्य आरोपींनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Rohit Sharma । चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! रोहित शर्माबाबत मोठी माहिती समोर
गेल्या ६ महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. 11 नोव्हेंबर 2006 रोजी राम नारायण विश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभैयाची बनावट चकमक झाली. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.