Crime news । राज्यात कायदे कडक करूनही गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले नाही. मागील काही दिवसांपासून सतत गुन्हे होत आहेत. गुन्हेगारीमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.वाढत्या गुन्हेगारीला थांबवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
Pune News । बिग ब्रेकिंग! निवडणुकांच्या तोंडावर पुणे पोलिसांनी आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड मधील थेरगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या मुलीचा तिच्याच वडिलांनी जीव घेतला आणि स्वतः देखील गळफास घेत जीवन संपवल्याचा प्रकार घडला आहे. बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भाऊसाहेब बेदरे (वय 43 वर्ष) हे थेरगाव मध्ये पत्नीसोबत एक मुलगा आणि एक मुलगी सह राहतात. त्यांच्या पत्नी राजश्री कामानिमित्त गावी गेल्यानंतर ही घटना घडली आहे
पत्नी पहाटे घरी आल्यानंतर त्यांनी भाऊसाहेब यांना फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. घरी आल्यानंतर मुलगा आशिषने दरवाजा उघडताच राजश्री यांनी मुलाकडे बाबा कुठे गेले आहेत? अशी विचारणा केली. त्या बेडरूममध्ये गेलेल्या असताना त्यांना मुलगी झोपलेली दिसली, पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्या किचनमध्ये आल्यानंतर त्यांना आणखी एकदा धक्का बसला. किचनमध्ये भाऊसाहेब यांनी गळफास घेतला होता. या घटनेनंतर त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाऊसाहेबांनी आर्थिक नियोजनतून जीवन संपवत असल्याची चिठ्ठी पोलिसांना आढळून आली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Rohit Pawar । अमोल मिटकरी यांनी काढली रोहित पवारांची लायकी, म्हणाले; “तुझी खरी लायकी केवळ…”