Ravindr Dhangekar । लोकसभा निवडणुकीचं (Loksabha election 2024) बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. जनता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला निवडून देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काँग्रेसकडून (Congress) पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Latest marathi news)
Ajit Pawar । मोठी बातमी! या बड्या नेत्याने उडवली अजित पवारांची झोप
पण लोकसभेची (Loksabha) उमेदवारी जाहीर होताच रवींद्र धंगेकर अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण धंगेकरांना उमेदवारी देताच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे नेते आणि सात वेळा नगरसेवक असलेले आबा बागुल (Aaba Bagul) यांनी व्हॉटस अपवर एक स्टेटस ठेवले आहे. ‘पुण्यात निष्ठेची हत्या ’ म्हणत त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी आबा बागुल हे पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण त्यांच्याजागी रवींद्र धंगेकर यांना तिकीट मिळाले. त्यामुळे आबा बागूल यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Ahmednagar Politics । मोठी बातमी! अहमदनगर दक्षिण मतदारसंघात नवा ट्विस्ट