मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालेले जवळपास तीन महिने झाले आहे. दरम्यान आत्तापर्यंत राज्यातील जिल्ह्यांना (Districts) पालकमंत्री (Guardian Minister) मिळाले नव्हते. अखेर तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath shinde) यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. परंतु पालकमंत्री पदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपच (bjp) पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे.
Gopichand Padalkar: “आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…” पडळकरांची जहरी टीका
महत्वाची बाब म्हणजे शिंदे सरकारमध्ये गृहमंत्री आणि अर्थमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सत्तेत असलेल्या सरकारमध्ये पालकमंत्रीपदाच्या बाबतीत सरकारमध्ये किंग ठरले आहेत. याच कारण म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. या सहा जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
शनिवारी रात्री मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक! काय असेल बैठकीचं कारण?
तसेच मागील काही दिवसांपासून पुण्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार आशी चर्चा चालू होती. परंतु आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण आता पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्र्यांची ही यादी पुढच्या अडीच वर्षांसाठी जशी आहे तशीच राहण्याची शक्यता कमी आहे. कारण दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार जाहीर झाल्यानंतर नव्या मंत्र्यांनादेखील काही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याती शक्यता आहे.
पीएम किसान लाभार्थ्यांची चिंता वाढली! 12 वा हप्ता दिवसेंदिवस लांबतोय, कारण…
अशी आहे जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी
1)राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
2)सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया,
3)चंद्रकांत पाटील- पुणे
4)विजयकुमार गावित- नंदुरबार
5)गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
6)गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव,
7)दादा भुसे – नाशिक
8)संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
9)सुरेश खाडे- सांगली
10)संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
11)उदय सामंत – रत्नागिरी, रायगड,
12)तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव),
13)रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
14)अब्दुल सत्तार- हिंगोली,
15)दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
16)अतुल सावे – जालना, बीड
17)शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
18)मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
सातारा जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीवर लम्पी रोगाचा परिणाम, बैलांच्या बाजार आणि प्रदर्शनाला बंदी