Amol Kirtika । लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाने नुकतीच त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र आता सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Manoj Jarange Patil । निवडणुकांना लागणार वेगळं वळण! जरांगे पाटलांनी घेतली मोठी भूमिका
माहितीनुसार, मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. चौकशीसाठी अमोल कीर्तिकर यांना ईडी कार्यालयामध्ये हजर राहावे लागणार आहे. असं या समन्स मध्ये नमूद करण्यात आले आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे ईडीचे कारवाईचे सत्र देखील वाढत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यावरून देखील विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता आणि यामध्येच आता ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना देखील समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे विरोधक पुन्हा आता आक्रमक झाले आहेत.
Bjp । ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार आहेत. या भागामध्ये त्यांची मोठी ताकद आहे. मात्र सध्या त्यांना ईडीचे समन्स बजावण्यात आलं आहे. यामुळे ठाकरे गटाचे मोठे टेन्शन वाढल आहे.
Jitendra Awhad । “…..तर अजितदादा जेलमध्ये जाणार,” जितेंद्र आव्हाडांचा इशारा