Crime News । सध्या सगळीकडे लग्नसराईचा (Marriage) हंगाम सुरु आहे. सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वच जण बोहल्यावर चढत आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकजण या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. पण लग्नानंतर पहिल्या रात्री जर जोडीदाराचा खरा चेहरा समोर आला तर अनेकांना धक्का बसतो. (Latest marathi news)
Satara Loksabha Election । अजितदादा बालेकिल्ला सोडणार? आज होणार महत्त्वाचा निर्णय
सध्या अशीच एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लग्न करून सासरी आलेल्या नवरीने लग्नानंतर पहिल्याच दिवशी असं काही केलं की त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला. (Crime) लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरदेव खोलीत वधूची वाट पाहत बसला. पण नवरी रोख रक्कम आणि दागिने घेऊन घरातून पसार झाली. या घटनेने पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Loksabha Election 2024 । महाविकास आघाडीला मोठा धक्का, हा बडा नेता लढवणार अपक्ष निवडणूक
याबाबत अधिक माहिती अशी की, जालौन शहरातील एका आईला आपल्या मुलाच्या लग्नाची सतत काळजी वाटत होती. त्यानंतर त्यांनी मध्यस्थांशी संपर्क साधून 70 हजार रुपये घेऊन मुलाचं लग्न लावून दिले. लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे धडाक्यात स्वागत केले. पण ती रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाल्याने सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Ram Satpute । प्रणिती शिंदेंबाबत राम सातपुतेंच मोठं वक्तव्य; म्हणाले…