दिल्ली : देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी देवस्थान एक आहे. अनेक भाविक भक्त देश विदेशातून दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देखील देतात. आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे.
Akshay Kumar: मुलीच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने केली खास पोस्ट; म्हणाला, “आज तू दहा वर्षांची…”
या मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी यांनी सांगितलं की, “देशामध्ये देवस्थानाच्या ९६० मालमत्ता असून यांची किंमत ८५,७०५ कोटी रुपये एवढी आहे. मंदिर समितीने १९७४ ते २०१४ सालादरम्यान वेगवेगळ्या सरकारच्या अंतर्गत ११३ मालमत्ता निकाली काढल्या आहेत. पण, २०१४ नंतर एकाही मालमत्तेची विक्री केलीली नाही.” अशी माहिती वाय वी सुब्बा रेडी यांनी दिली आहे.
उडीद उत्पादकांसाठी खुशखबर! दहा हजारांवर मिळतोय बाजारभाव
या मंदिराची २०२१ साली पहिली तर, यंदा दुसरी श्वेतपत्रिका काढण्यात आलीये . दोन्ही श्वेतपत्रिका तिरुपती देवस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. दरम्यान,या देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १४ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची ठेवी आहे. तर, १४ टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे आहे. यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
Abdul Sattar: “कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा” ; अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त वक्तव्य