Congress । राज्याच्या राजकारण आगामी निवडणुकीवरून (Loksabha election) तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातले दोन मोठे पक्ष फुटल्याने जनता कोणाला निवडून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीय पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहे. अशातच काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याचा अर्ज झाला आहे. (Latest marathi news)
Dilip Valse Patil । ब्रेकिंग! दिलीप वळसे पाटील यांचा अपघात
जात प्रमाणपत्र अवैध असल्याने रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या रामटेक मतदारसंघातून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. सुनिल साळवे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र तयार करताना बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार दाखल केली होती.
Sharad Pawar । बारामती मतदारसंघावर शरद पवारांचा सर्वात मोठा निर्णय
त्यानंतर तपासणीदरम्यान, जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचं अनुसूचित जातीत चांभार जातीचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं आहे. प्रमाणपत्र रद्द करताच शिवसेनेने रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचं मत ऐकून उमेदवारी रद्द केली. यामुळे काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर खूप मोठा धक्का बसला आहे.
Savitri Jindal । देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडली काँग्रेसची सोडली, भाजपमध्ये करणार प्रवेश?
माहितीनुसार, रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याने पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे रामटेकमधील अधिकृत उमेदवार असू शकतात. दरम्यान, नुकतीच काँग्रेसने आपल्या उमेदवारांची 8वी यादी जाहीर केली असून त्यात 14 नावांचा समावेश असून या यादीत पक्षाने झारखंडमधील 3, मध्य प्रदेशातील 3, तेलंगणातील 4 आणि उत्तर प्रदेशातील 4 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
Savitri Jindal । देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडली काँग्रेसची सोडली, भाजपमध्ये करणार प्रवेश?