Satara Politics News । शरद पवार गटात मोठी खळबळ; या खासदाराने निवडणूक लढण्यास दिला नकार

Sharad Pawar

Satara Politics News । सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील साताऱ्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शरद पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार (Sharad Pawar ) यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.

Vasant More । मोठी बातमी! वसंत मोरेंचा मास्टर प्लॅन आला समोर

Topers Ad

त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघात येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवाराची घोषणा केली जाईल अशी देखील माहिती शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार नेमकी उमेदवारी कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का! ‘या’ ठिकाणी मिळणार नाही घड्याळ चिन्ह

आम्ही सर्वांनी श्रीनिवास पाटील यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. मात्र शेवटी त्यांनी नाही म्हटलं.. इच्छा नसताना देखील आम्ही त्यांची भूमिका मान्य केली आहे. दोन-तीन दिवसात या जागेवरील उमेदवार ठरवू. या ठिकाणी ज्याची निवड केली जाईल त्याला निवडून आणण्याच काम आपल आहे. असे शरद पवार यांनी सांगितल आहे.

Maharashtra Politics । नवनीत राणांविरोधात बच्चू कडू मैदानात! लवकरच करणार उमेदवाराची घोषणा

Spread the love