Uddhav Thackeray । राजधानी दिल्लीत उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं खुलं आव्हान, म्हणाले; “हिंमत असेल तर…”

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । आज राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची (India Alliance) सभा पार पडली. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन केलं होतं. आयोजित लोकशाही बचाओ रॅलीमध्ये (Loktantra Bachao Rally) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, शरद पवार (Sharad Pawar) तसेच अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी हजेरी लावली. (Latest marathi news)

Supriya Sule । सुप्रिया सुळे यांचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले, “माझ्या सुनेत्रा वहिनीला…”

यावेळी सभेदरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला (BJP) खुलं आव्हान दिलंय. “माझ्या देशातील भारतीय घाबरणारे नाहीत, तर लढणार आहेत. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ईडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंट हे भाजपच्या तीन साथी पक्ष असून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यावर आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकलं. ही कोणती पद्धत आहे?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार बंडखोरी

“मजबूत देशासाठी आपल्याला एकजुटीचं सरकार आणावं लागणार आहे. जर देशातील प्रांत-राज्याचा सन्मान करणारं सरकार आणलं तरंच देश वाचू शकतो. तुम्हाला तुमचं भविष्य कुणाच्या हातात द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. आम्ही प्रचारासाठी नाही, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी धोकादायक आहे. आता हा व्यक्ती आणि या पक्षाचं सरकार पाडण्याची वेळ आली आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Prakash Ambedkar । मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे वाढणार महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी?

Spread the love