मुंबई : गोरगरिबांसाठी आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला या योजनेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत गोरगरिबांना 10 रुपयांत जेवण मिळत होते. त्याचबरोबर कोरोना काळात याची किंमत 5 रुपये करण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली होती. राज्यामध्ये एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून वेगेवेगळ्या प्रकारची मदत देखील केली जाते.
कांद्यामुळे नाफेडला बसला मोठा फटका, ‘या’ जिल्ह्यातील कांदा सडला
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, ” शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा शिंदे-फडणवीस सरकारला संशय आहे. आता या योजनेचा व्यवस्थित आढावा घेतल्यानंतर ही योजना चालू ठेवायची की बंद याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे.
नोकरी शोधनाऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ कंपनी करणार 9000 जागांची मेगाभरती