Chhatrapati Sambhajinagar Fire । छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी आज पहाटेच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरामध्ये एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Ahmednagar Politics । …. तर मी उमेदवारी मागे घेणार, निलेश लंकेंना सुजय विखेंनी दिलं खुलं आव्हान
पहाटेच्या सुमारास अचानक कपड्याच्या दुकानात आग लागली. या आगळीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले, दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छावणी परिसरामध्ये छावणी दाना बाजार गल्लीमध्ये महावीर जैन मंदिराच्या बाजूला कपड्याच दुकान होतं. या कपड्याच्या दुकानात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.
#WATCH | Maharashtra: A massive fire broke out in a clothing shop in the cantonment area of Chhatrapati Sambhajinagar, Aurangabad. Further details awaited. pic.twitter.com/Uokb80upnP
— ANI (@ANI) April 3, 2024
Baramati Loksabha । मोठी बातमी! बारामतीत प्रकाश आंबेडकरांच्या खेळीने पवार कुटुंबाला मोठा धक्का
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली आणि तेथील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. आग खूप भीषण होती त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचेपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Sharad Pawar । “…तर ४ जूनला तुम्हाला समजेल”, शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य