सोलापूर: उजनी धरणातून मुबलक पाणीपुरवढा मिळत असल्यामुळे करमाळा, माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांत केळींची लागवड मोठ्या वाढली आहे. केळीच्या निर्यातीमध्ये सोलापूरने (Solapur) जळगावला देखील मागे टाकले आहे. या वर्षी एप्रिल ते जून यादरम्यान राज्यामधून झालेल्या एकूण केळी (banana) निर्यातीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा वाटा ७५ टक्के इतका झाला आहे.
धक्कादायक! भगर खाल्ल्याने १३ जणांना एकाचवेळी विषबाधा; वाचा सविस्तर
राज्यात केळी उत्पादनात अग्रेसर म्हणून जळगावची ओळख आहे. पण मागच्या पाच सहा वर्षांपासून सोलापूर जिल्हा केळी निर्यातीत आघाडीवर आहे. यावर्षी राज्यातून ६२,२०७ टन केळींची निर्यात झाली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातून ४७,२०० टन केळी निर्यात झाली आहे. राज्याच्या एकूण निर्यातीत सोलापूर जिल्ह्याचा ७५.८८ टक्के वाटा आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरणार
दरम्यान, उजनी धरणातून मुबलक पाणीपुरवढा मिळत असल्यामुळे करमाळा, माढा,माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांत केळींची लागवड मोठ्या वाढली आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी पिकाखालील एकूण क्षेत्र ७७१६ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये करमाळय़ात ३१७४ हेक्टर, माळशिरसमध्ये २११७ हेक्टर, माढय़ात १३९० हेक्टर आणि पंढरपूरमध्ये ५७९ हेक्टर इतके क्षेत्र आहे.