Bjp । ब्रेकिंग! भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

Bjp

Bjp । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील भाजपचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आम्ही तुम्हाला सोडतोय अशी थेट भूमिका अतुल देशमुख यांनी घेतली आहे. आणि त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

Eknath Khadse । सर्वात मोठी बातमी! एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; स्वतःच केला खुलासा

आपण भाजपमध्ये चांगले काम केले मात्र भाजप पक्षाने आपला विचार केला नसल्याची खंत देखील अतुल देशमुख यांनी व्यक्त केली आहे . पक्ष ताकद देत नसल्याने आपण बाहेर पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या पदाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

Prakash Ambedkar । बीडमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला उमेदवार; पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या उमेदवाराला देणार टक्कर

दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अतुल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेतृत्व आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता भाजपमधून बाहेर पडल्यानंतर अतुल देशमुख नेमकि काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar । माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणूक लढवणार? महत्वाची माहिती समोर

Spread the love