मुंबई : महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी होणार असून सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार असून आज एक महत्त्वपूर्ण निर्णय देखील समोर येण्याची शक्यता वर्तवली जातेय. ही सुनावणी LIVE होणार असून राज्यातील जनतेला देखील पाहता येणार आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) लाईव्ह सुनावणी होणार आहे.
Solapur: केळींच्या निर्यातीत सोलापूर जिल्हा आघाडीवर; उसापेक्षा जास्त उत्पन्न
खरी शिवसेना आमची, असा दावा करणाऱ्या शिंदे गटाविरोधात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शिंदे गटाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. तर आधी आमदारांच्या अपात्रतेसंबधी निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा दावाही शिवसेनेने सुप्रीम कोर्टात केला होता. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा युक्तिवाद केला जाईल त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत म्हटलं होतं.
Alia-Ranbir: “आलीया रात्रभर बेडवर…”, रणबीर कपूरने केला आलियाच्या ‘या’ सवयीचा खुलासा
यामुळे खरी शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार?, अशा अनेक एकमेकांत गुंतलेल्या विषयांवरील सर्व याचिकांचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. हा राजकीय पेच सोडवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली. या सुनावणीत नेमकं काय घडतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धक्कादायक! भगर खाल्ल्याने १३ जणांना एकाचवेळी विषबाधा; वाचा सविस्तर