Raj Thackeray । निवडणूक आयोगाने (Election Commission) एकूण पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. राज्यात दररोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नुकताच गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. (Latest marathi news)
राज ठाकरे यांनी जागावाटपाबाबत अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं होत. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावरुन मनसे उमेदवाराने निवडणूक लढवण्याचा सल्ला दिल्याने महायुतीत जाण्याबाबतची बोलणी फिस्कटल्याचं त्यांनी जाहीर केलं होत. पण आता सूत्रांच्या माहितीनुसार मनसेचा महायुतीतला प्रवेश हा कमळ नाही तर धनुष्यबाणामुळे फिस्कटला आहे.
राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतची ताज लँड्समधील बोलणी फिस्कटल्याने मनसेचा महायुतीत प्रवेश होऊ शकला नाही. मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी, असे एकनाथ शिंदे यांचे मत होते. पण आपण इंजिन सोडून दुसऱ्या कोणत्याही चिन्हावर लढणार नाही, अशी राज ठाकरे यांनी भूमिका घेतली होती.
Rashmi Barve । मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा रश्मी बर्वे यांना सर्वात मोठा धक्का